Home महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव – वहुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन...

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव – वहुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्यात

1
Three water tanks should be constructed instead of two under the Dasgaon-Vahur water supply scheme in Mahad Taluka, Raigad district.

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनानांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनजीवन मिशन अंतर्गत महाड व माणगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत व नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत किती नळ जोडणी बाकी आहे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्यावा व त्यातून नळ पाणी पुरवठा योजनेची नळ जोडणी पूर्ण करून घ्यावी. रायगड जिल्ह्यामधील मंजूर योजनेमध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करून सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी व योजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मोहन सरावदे, आदी उपस्थित होते.

यावेळी दाभोळ व टोळा (बु), दासगाव – वहुर, खैरे व २१ गावे, पोलादपूर व १४ योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.