Home टेक न्युज १ लाख २५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रमाणपत्र; ‘मराठी भक्तीची भाषा’ –...

१ लाख २५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रमाणपत्र; ‘मराठी भक्तीची भाषा’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
1.25 lakh rickshaw and taxi drivers receive Marathi proficiency certificates; ‘Marathi is the language of devotion’ – Deputy Chief Minister Eknath Shinde.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’ची सांगता झाली. मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी १०५ दिवस चाललेल्या या अभियानातून मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केलेल्या १ लाख २५ हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

हा उपक्रम समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. परिवहन मंत्र्यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारला, हे कौतुकास्पद आहे. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधायला हवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.