महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर १४ नव्या सदस्यांची नियुक्ती; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन

राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची घोषणा केली आहे. यामध्ये शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच सदस्यांसह नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या नऊ सदस्यांचा समावेश आहे. हे सदस्य अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षे पदावर राहतील. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. […]
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर १४ नव्या सदस्यांची नियुक्ती; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन
14 new members appointed to the Maharashtra Medical Council; Medical Education Minister Hasan Mushrif extends congratulations.

राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची घोषणा केली आहे. यामध्ये शासनाने नामनिर्देशित केलेल्या पाच सदस्यांसह नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या नऊ सदस्यांचा समावेश आहे. हे सदस्य अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षे पदावर राहतील. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

शासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांमध्ये डॉ. अजय गोविंद केणी, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत नारायण चौधरी, डॉ. राजीव येरवडेकर आणि डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांचा समावेश आहे. तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमध्ये डॉ. संतोष अप्पासाहेब कदम, डॉ. संजय साहेबराव कदम, डॉ. निलेश वसंतराव निकम, डॉ. संजय गणेशराव देशपांडे, डॉ. सुनील माधवराव इंगळे, डॉ. अनिलकुमार भास्कर पाटील, डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे, डॉ. उज्ज्वला किशनराव कराड आणि डॉ. अनिल शंकर पाचनेकर यांचा समावेश आहे.

सर्व नवीन सदस्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: