
पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना केवळ आजच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजीआयआय १०० एक्स महाराष्ट्र, पुणे संवाद व सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) सहकार्याने हॉटेल हयात येथे विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सिम्बायोसिस सोसायटीच्या प्रधान संचालिका व सिम्बायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.















