श्रावणी येथे 10,000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलिंग सेंटर (BMC) चे उद्घाटन मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) सहाय्यित NDSच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
या BMC अंतर्गत एकूण 100 गावांमधून दूध संकलन प्रस्तावित असून, त्यामुळे दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे 100 महिलांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.
दूध संकलनामुळे गावातील पशुपालकांना त्यांच्या दुग्ध उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
दूध संकलन व गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया गावपातळीवर पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने दूध उत्पादकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल.
या उपक्रमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि दुग्ध व्यवसायाचा विकास साधण्यास मोठी मदत होणार आहे.
















