Home महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह

0
President Draupadi Murmu to grace the second convocation ceremony of AIIMS Nagpur tomorrow

नागपूर : राष्ट्रपती दौपदी मुर्मू दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असून 15 एप्रिल रोजी त्यांच्या मुख्य उपस्थितीत येथील एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या द्वितीय  दीक्षांत समारोहास त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एम्स येथील मुख्य सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहील.

या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती या लोकभवन येथे जाणार असून सायंकाळी 4.50 वाजता राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 78 व्या भारतीय महसूल सेवा बॅचच्या समावर्तन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवालमहासंचालक सीबीचेन के. मॅथ्यू यांची उपस्थिती राहील.

या कार्यक्रमानंतर त्या लोकभवन येथे मुक्कामी राहणार आहेत. दिनांक 16 एप्रिल रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमला त्या भेट देणार असून महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षान्त समारोहास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तेथील समारोह आटोपून राष्ट्रपती महोदय नागपूर विमानतळ येथून दिल्लीकडे प्रयाण करतील.