
या विषयावर एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार १८, सोमवार २०, मंगळवार २१ आणि बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर (News On AIR) या ॲपवरही उपलब्ध असेल.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २१ एप्रिल २०२६रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.















