
हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या उद्देशाने शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी “महिला लोकशाही दिन” आयोजित करण्यात येतो.
त्याअनुषंगाने एप्रिल महिन्यात दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तक्रारदार महिलांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी अर्ज सादर करून दुपारी १.०० वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. तसेच, इच्छुक महिलांना ऑनलाईन पद्धतीनेही खालील लिंकद्वारे दुपारी १.०० ते २.०० या वेळेत तक्रार मांडता येणार आहे.
ऑनलाईन लिंक: https://meet.google.com/usj-krox-uvv
महिलांच्या तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. न्यायप्रविष्ट, आस्थापना विषयक व सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
– सदस्य सचिव
महिला लोकशाही दिन
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार
#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#MahilaLokshahiDin#WomenEmpowerment#PublicGrievance#WomenSupport#DistrictAdministration#MaharashtraGov#SocialJustice#WomenRights#GovernmentInitiative#PublicService















