शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान

सुरगाणा(प्रतिनिधी):-शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माणी (ता. सुरगाणा) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मा. शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले.
शांताराम थविल यांना राज्यस्तरीय ‘सेवागौरव पुरस्कार 2026’ प्रदान
Shantaram Thavil conferred with the state-level ‘Seva Gaurav Puraskar 2026’

​शांताराम थविल यांनी सामाजिक जबाबदारी मानून समाजासाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी वेळोवेळी सक्रिय सहभाग व सहकार्य दर्शवले आहे. त्यांच्या या उत्तुंग शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
​या पुरस्काराबद्दल शासकीय कन्या आश्रमशाळा माणी येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी थविल गुरुजींचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: