आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी

नंदुरबार:-आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधामध्ये सुसुत्रता आणण्याबाबत एकत्रित सुधारित नियमावली बाबत शासन निर्णय क्र आवगृ-1325/प्र.क्र 154/ का. 12 दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आला होता.
आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक हितच केंद्रस्थानी
The educational interests of tribal students are at the core.

वसतीगृहातील विद्यार्थ्याच्या मागणीनुसार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या परिपत्रक क्र आवगृ 1325/प्र.क्र 154/का 12 दिनांक 25/08/2026 रोजी शासन निर्णयास स्थगित देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्र शासन निर्णय क्र- नानिशा- 1126/प्र.क्र. 94 / का. 12 (1820431) दिनांक 25 ऑगस्ट 2026 नुसार आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या नामाकिंत शाळेत प्रवेश देणे या योजने अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जमातीच्या इ.3री व 4थी च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेली ज्ञानेश्वर पब्लिक स्कुल व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कुल, भानसहिवरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर या शाळेतुन 141 विद्यार्थ्याचे पालकांच्या विनंतीवरून इतर 4 नामांकित शाळेत समायोजन करणे बाबत शासन स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन इतर नामांकित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. लघिमा तिवारी (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प् तळोदा जि. नंदुरबार