स्थानिक रोजगाराला बळ; नंदुरबारमध्ये ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

ग्रामीण मजुरांचे स्थलांतर रोखून गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
स्थानिक रोजगाराला बळ; नंदुरबारमध्ये ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित
Nandurbar-Migration-Control-Cell
रोजगाराची गरज असलेल्या ग्रामीण मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे, रोजगाराशी संबंधित अडचणी व तक्रारींची नोंद घेणे आणि ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कक्षामार्फत —
  •  रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी मार्गदर्शन
  •  उपलब्ध रोजगाराच्या संधींची माहिती
  •  रोजगाराशी संबंधित तक्रारींची नोंद
  •  ग्रामपंचायत व यंत्रणांशी समन्वय
  •  रोजगार उपलब्धतेसाठी आवश्यक कार्यवाही
 जलसंधारण, मृद व जलसंधारण, शेतीपूरक कामे, वृक्षलागवड, फळबाग विकास, चारा विकास आदी अनुज्ञेय कामांना गती देऊन स्थानिक पातळीवर उपजीविकेच्या संधी बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.
 मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष हेल्पलाइन:
02564-299544
 रोजगारासाठी स्थलांतर करण्यापूर्वी आपल्या गावात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती घ्या!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: