खोडाईमाता यात्रा उत्सव: झुल्या-पाळण्यांचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ तपासण्याचे प्रशासनाला आवाहन

नंदुरबार येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री खोडाईमाता यात्रेच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था तसेच महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी यात्रेत येणाऱ्या बाहेरील व्यापारी, फेरीवाले आणि मनोरंजन साधन चालकांची नोंदणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
खोडाईमाता यात्रा उत्सव: झुल्या-पाळण्यांचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ तपासण्याचे प्रशासनाला आवाहन
Khodaimata-Fair-Swing-Fitness-Certificate
  • यात्रेचा कालावधी: नंदुरबार येथील प्रसिद्ध श्री खोडाईमाता यात्रा ११ ते २० ऑक्टोबरया कालावधीत नवरात्रोत्सवात आयोजित केली जाणार आहे. या १० दिवसांच्या काळात यात्रेत भाविकांची प्रचंड गर्दी होते.
  • नोंदणीची मागणी: गर्दीचा गैरफायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यात्रेत येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय व बाहेरील व्यापाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, स्टॉल क्रमांक आणि आधार कार्डसह इतर शासकीय ओळखपत्रांची तपासणी करून स्वतंत्र नोंद ठेवावी.
  • सुरक्षा प्रमाणपत्रे अनिवार्य: झुल्या, पाळणे व इतर तांत्रिक मनोरंजन साधने चालवणाऱ्यांकडून त्यांचे परवाने, सुरक्षा प्रमाणपत्रे आणि यंत्रणेचे फिटनेस प्रमाणपत्र तपासणे अनिवार्य करावे.
  • कामगारांची माहिती पोलीस स्टेशनला देणे: यात्रेत काम करणाऱ्या सर्व कामगारांची ओळख पटवून त्यांची नोंद आयोजकांकडे असावी आणि ही यादी स्थानिक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून द्यावी.
  • इतर नियम व कायदे: यात्रेच्या ठिकाणी अग्नी सुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि ध्वनिक्षेपक नियमांचे पालन व्हावे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ चा संदर्भ देत, यात्रेतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधक व नोंदणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: