सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न
(नंदुरबार) सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान शहादा येथे नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच ममताबेन अशोक भिल यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता तसेच SAM बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ४१ नागरिकांची नेत्र तपासणी, तर १६६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद नाईक, नेत्ररोग विभागातील डॉ. योगेश सोनवणे, डॉ. सतीश नांद्रे व डॉ. रुचिता चौधरी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, CHO, ANM, MPW, आशा गटप्रवर्तक व आशा सेविका यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयातून शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
आरोग्य सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा सेवाभावी संकल्प!
Follow Us:

