दिवाळीत फटाका विक्रीसाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा
नंदुरबार: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या सर्व परवानाधारकांनी विस्फोटक नियमांनुसार सुरक्षा व पर्यावरणविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे.
फटाका विक्रीसाठी मंजूर जागेवरच स्टॉल उभारणे आवश्यक असून, दोन स्टॉलमध्ये किमान 3 मीटर अंतर ठेवावे. स्टॉलमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवण्यास तसेच धूम्रपानास प्रतिबंध राहील. परिसरात अग्निसुरक्षा साधने व पाण्याची व्यवस्था ठेवणे बंधनकारक आहे.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात फटाक्यांचा वापर करता येणार नाही. रात्री10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फटाके वाजविण्यास मनाई राहील. वाहनातून किंवा फिरत्या वाहनाद्वारे फटाका विक्री करता येणार नाही.
मंजूर परवान्याशिवाय फटाका विक्री करणे बेकायदेशीर असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
एलई-5 परवाना अर्ज 5 ते 19 ऑक्टोबरदरम्यान वितरित केले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 23 ऑक्टोबर 2026असून, मंजूर परवान्यांचे वितरण 27 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी फटाका विक्री व साठवणुकीसंदर्भातील सविस्तर जाहीरात वाचावी.
सुरक्षित दिवाळी, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूया!
Follow Us:

