सेवा संकल्प अभियानांतर्गत रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर

नंदुरबार : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रम व सेवा संकल्प अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, उपकेंद्र रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत रोझवा पुनर्वसन येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर
Rozva-Rehabilitation-Health-Camp
            तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चौधरी यांच्या निर्देशानुसार व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुंदर वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात मिशन 100 दिवसांतर्गत उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली. गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार, आयर्न-फोलिक ॲसिड गोळ्यांचे वाटप तसेच आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
समता फाऊंडेशनच्या सहकार्याने ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करून पुढील उपचारांसाठी आवश्यक सल्ला देण्यात आला. तसेच नागरिकांची आभा (ABHA) व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली.
          रुग्णांचे वेळेवर निदान व्हावे यासाठी आवश्यक रक्त तपासण्याही मोफत करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांनी सक्रिय सहभाग घेतला.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: