पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 

नागपूर:  मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होत तीन शिवलिंगांची निर्मिती केली. मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. या सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे व समितीचे सदस्य […]
पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट 
Chief Minister Devendra Fadnavis visits the Parthiva Shivling creation ceremony.

नागपूर:  मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होत तीन शिवलिंगांची निर्मिती केली.

मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी प्रथम शिवलिंगाचे दर्शन घेतले. या सोहळ्याचे संयोजक दयाशंकर तिवारी, अनिल बावनगडे, अमोल कोल्हे, आशिष पाली, नवीन जैन, प्रभाकर ठाकरे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीतील शिवआराधनेचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले, श्रावण महिन्यात आयोजित या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण पवित्र झाले असून येथे महिला पुरुषांसह दिव्यांगजन आणि बालकेदेखील पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करीत असल्याचे दृश्य प्रसन्नता निर्माण करणारे आहे. भारतीय संस्कृतीत  शिवआराधना महत्त्वाची मानली जाते. आदी-अनंताचे प्रतीक म्हणजे शिव. या शिवपूजेतून आत्मिक शांतता व मानसिक स्थैर्य प्राप्त होत आहे. यावर्षीच्या उपक्रमात ९१ लक्ष पार्थिव शिवलिंग निर्मिती करण्यात येणार असून  महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दि १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा ९१ लाख पार्थिव शिवलिंग निर्मितीचा संकल्प सोडण्यात आला आहे. शिवलिंगांसाठी गंगा तीरावरून येथे माती आणण्यात आली असून दररोज सूर्यास्तानंतर ह्या पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करण्यात येते. दि. १२ सप्टेंबर रोजी यज्ञ व महाप्रसादाने ह्या सोहळ्याची सांगता होणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: