विज्ञापित

बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

लांजा(प्रतिनिधी):-प्रति वर्षाप्रमाणे बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे परमपूज्य रामचंद्र वासुदेव देसाई यांच्या स्मृतीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. परमपूज्य देसाई महाराजांनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थमहाराज यांच्या येथे झालेल्या दृष्टांतानुसार काळाच्या पडद्याआड खंडित झालेलं बल्लाळ गणेश देवस्थान शोधून काढलं त्या देवस्थानाचा जिर्णोद्धार त्यांच्या भक्तांनी केला त्यांच्या पश्चात प्रभानवल्ली येथे त्यांचे स्मृतिस्थळ केले […]
बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Guru Purnima celebrated with enthusiasm at the Ballal Ganesh Temple in

लांजा(प्रतिनिधी):-प्रति वर्षाप्रमाणे बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे परमपूज्य रामचंद्र वासुदेव देसाई यांच्या स्मृतीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. परमपूज्य देसाई महाराजांनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थमहाराज यांच्या येथे झालेल्या दृष्टांतानुसार काळाच्या पडद्याआड खंडित झालेलं बल्लाळ गणेश देवस्थान शोधून काढलं त्या देवस्थानाचा जिर्णोद्धार त्यांच्या भक्तांनी केला त्यांच्या पश्चात प्रभानवल्ली येथे त्यांचे स्मृतिस्थळ केले गेले असून महाराज तिथे अजूनही आहेत असा भक्तांचा विश्वास आहे बल्लाळ गणेश देव व देसाई महाराज यांचे दर्शन घेतले असता आपले कुठलेही असाध्य काम सहज होऊन जाते असा विश्वास परिसरामध्ये आहे. श्री बल्लाळ गणेश व इतर देवतांचे पूजन झाल्यानंतर रामचंद्र वासुदेव देसाई महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक श्री जयवंत माजल कर यांच्या हस्ते करण्यात आला महाआरतीनंतर महाप्रसाद नंतर अनिल चव्हाण यांचे भजन यांच्या भजना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाला
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षअमोल रेडीज सचिव वसंत पावसकर व सदस्य नूरमोहम्मद डबीर, मंगेश जाधव, जयवंत माजळकर, रवींद्र पराडकर आणि उत्सव समिती अध्यक्ष भरत  पाटील, चंद्रकांत उर्फ पप्पू धनावडे हे ट्रस्टी तसेच सल्लागार बाळूराव ब्रीद आणि गुरु मासये, जयवंत जाधव, सुनील गुरव, शशिकांत चव्हाण, विकास बेर्डे, उमेश खानविलकर, शरद चव्हाण, विठोबा नागवेकर, उदय जमेनीस, पांडुरंग साळुंखे, प्रमोद धनावडे, सुधीर जोशी, व बहुसंख्य भक्त मंडळी उपस्थित होते.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: