महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात दि. १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत (सकाळी 11 ते सायं 8 वाजेपर्यंत) विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या पुढाकाराने हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या पैठणी, करवत काठी साड्या, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.
















