तोरणमाळच्या ‘राठवा’ समूहाचा दिल्लीत डंका; अवघ्या १२ दिवसांत ५.६० लाखांची विक्रमी विक्री

तोरणमाळच्या 'राठवा स्वयंसहायता समूहा' चा दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (International Trade Fair Delhi) डंका; अवघ्या १२ दिवसांत ५.६० लाखांची विक्रमी उलाढाल!
तोरणमाळच्या ‘राठवा’ समूहाचा दिल्लीत डंका; अवघ्या १२ दिवसांत ५.६० लाखांची विक्रमी विक्री
toranmal-rathwa-group-delhi-record-sales-5-60-lakh-12-days
         सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील महिलांनी जिद्द, कष्ट आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर देशाच्या राजधानीत यशाचे नवे शिखर गाठले आहे. जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, परमेश्वर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार ‘उमेद’ कक्षाच्या नियोजनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या ‘राठवा स्वयंसहायता समूहाने’ (मु. सिंधी दिघर, पो. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार) भारत मंडपम, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (International Trade Fair Delhi) आपल्या उत्पादनांची मोठी छाप पाडली आहे.
       दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झालेल्या या भव्य प्रदर्शनात राठवा समूहाने आपल्या उत्पादनांचा विशेष स्टॉल लावला असुन अस्सल ग्रामीण चवीचे आणि पौष्टिक असे रोस्टेड बाजरी, रोस्टेड गहू, रोस्टेड हरभरा आणि सोया यांसारख्या विविध आरोग्यदायी पदार्थांना दिल्लीकरांसह देश-विदेशातील ग्राहकांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.
या उत्तम प्रतिसादाच्या जोरावर समूहाने आत्तापर्यंत तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांची (₹ ५,६०,०००/-) विक्रमी विक्री नोंदवली आहे. हे प्रदर्शन २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, प्रदर्शनाचे अजून दोन दिवस शिल्लक असल्याने या विक्रीचा आकडा आणखी वाढणार आहे.
       दुर्गम अशा तोरणमाळ परिसरातील महिलांनी तयार केलेल्या पौष्टिक आणि दर्जेदार उत्पादनांना मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठ जिल्ह्यातील इतर बचत गटांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ‘उमेद’ अभियानाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महिला खऱ्या अर्थाने ‘लखपती दीदी’ आणि आत्मनिर्भर होत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: