जिल्हा परिषद नंदुरबार येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा!
जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे प्रतिमापूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांनी संविधानिक कर्तव्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) गणेश मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, शिक्षणाधिकारी क्रांती आर्सेर्डे, तसेच उप शिक्षणाधिकारी वंदना वळवी आणि निलेश लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खाते प्रमुख, मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow Us:

