राज्य सेवेतील ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा नंदुरबार जिल्हा अभ्यास दौरा संपन्न!

(नंदुरबार) मा. उपमहासंचालक तथा संचालक, रा.ग्रा.वि.स., यशदा, पुणे यांच्यामार्फत राज्य सेवेतील वर्ग-१ च्या ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्याचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
राज्य सेवेतील ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा नंदुरबार जिल्हा अभ्यास दौरा संपन्न!
33 Probationary State Service Officers Conclude Nandurbar District Study Tour
    या दौऱ्यात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक राज्यकर आयुक्त, सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच उद्योग उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
       या अभ्यास दौऱ्यादरम्यान सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमण गोयल (भा.प्र.से.) यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची माहिती, प्रशासकीय कार्यपद्धती, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि जिल्हास्तरीय प्रशासनातील आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभ्यास दौऱ्यामुळे परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाज समजून घेण्याची आणि क्षेत्रीय अनुभवातून माहीती आत्मसात करण्याची संधी मिळाली.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: