महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा; महसूल वसुली आणि गौण खनिजावरील कारवाईला गती देण्याचे निर्देश!
(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासकीय महसूल वसुली, वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, गौण खनिज, RTS प्रकरणे आणि ई-करार आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
महसूल वसुलीला प्राधान्य
शासकीय महसूल वसुली लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पुढील आठवड्यात वसुलीत वाढ करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करून सर्वांनी समन्वयाने काम करावे. वसुलीची रक्कम शासन जमा खात्यात वेळेत जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रूपांतर
आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव जमा करून संबंधित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.
गौण खनिजावरील कारवाई तीव्र करा
गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी SDM, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि RTO पथकाने समन्वयाने कारवाई करावी. दररोजच्या कारवाईचा अहवाल सादर करावा. अवैध स्टोन क्रशरची तपासणी, RTS प्रकरणांचा वेळेत निपटारा
RTS अंतर्गत प्राप्त व प्रलंबित सर्व प्रकरणे प्राधान्याने हाताळून विहित वेळेत निकाली काढावीत. आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीत देण्यात आलेल्या सर्व निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
Follow Us:

