नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, तोरणमाळ येथे विद्यार्थी–पालक मेळावा उत्साहात संपन्न

तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात विद्यार्थी–पालक मेळावा 2025 मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शिक्षण, संस्कार आणि समुदायभावनेचा संगम असलेला हा मेळावा केवळ शैक्षणिक कार्यक्रम न राहता पालक–विद्यार्थी–शिक्षक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला. मेळाव्याच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या लेझीम नृत्याने व पारंपरिक स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी 22 गावांतील पालक मोठ्या संख्येने […]
नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, तोरणमाळ येथे विद्यार्थी–पालक मेळावा उत्साहात संपन्न
Student-parent meet concluded with enthusiasm at Netaji Subhash Chandra Bose Residential School, Toranmal

तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात विद्यार्थी–पालक मेळावा 2025 मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शिक्षण, संस्कार आणि समुदायभावनेचा संगम असलेला हा मेळावा केवळ शैक्षणिक कार्यक्रम न राहता पालक–विद्यार्थी–शिक्षक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला.

मेळाव्याच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या लेझीम नृत्याने व पारंपरिक स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी 22 गावांतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षण व अर्थ सभापती जिल्हा परिषद नंदुरबार श्री. गणेश पराडके, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्री. वाणी, गटशिक्षणाधिकारी श्री. डी.डी. राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दीपिका बारी, केंद्रप्रमुख श्री. कोमलसिंग पाडवी, सरपंच श्री. सीताराम यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन पत्की यांनी केले. प्रास्ताविक श्री. रामदास जाधव यांनी मांडले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजाराम वळवके यांनी शाळेची प्रगती, डिजिटल शिक्षण, शिक्षक उपस्थिती, गुणवत्ता वृद्धी व भविष्यातील योजना यांची सविस्तर माहिती देत विद्यालयाला राज्यातील दर्जेदार निवासी विद्यालय बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.

आदिवासी बोलीभाषेतून पालकांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, उपस्थिती आणि शाळेच्या सुविधांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या भाषणातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, पालकांचा सहभाग आणि शिस्तीचे मूल्य अधोरेखित झाले.

मुख्य अतिथी श्री. गणेश पराडके यांनी विद्यालयाच्या कार्याची प्रशंसा करत विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी ॲम्ब्युलन्स, निवासी वैद्यकीय पथक व आशा वर्कर नियुक्ती जाहीर केली. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.

हा मेळावा शिक्षण, संस्कार आणि समाज एकत्र येण्याचा प्रेरणादायी आदर्श ठरला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: