विज्ञापित

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर

स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे. विज्ञापित सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, […]
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर
The 'Chitrapatī V. Shantaram Lifetime Achievement Award' for 2025, conferred by the Department of Cultural Affairs, goes to veteran music composer Pandit Hridaynath Mangeshkar.

स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.

विज्ञापित

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाचा यासंदर्भातील अधिकृत शासननिर्णय निर्गमित झाला आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

#सांस्कृतिककार्यविभाग

#जीवनगौरवपुरस्कार

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: