कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्कारांचे वितरण
डोंबिवली येथे करण्यात आले होते. 24 ऑक्टोबर रोजी शनिवारी महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 25 ऑक्टोबर रोजी पुरुषांच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा व कोकणरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.
भजन स्पर्धेचे विजेते याप्रमाणे महिला गट
प्रथम पारितोषिक देव भूतनाथ महिला मंडळ सागाव, द्वितीय पारितोषिक आई जननी कुंभळजा भजन मंडळ, हेदुटणे,
तृतीय पारितोषिक दादरेकर प्रसादिक भजन मंडळ, दिवा, पुरुष गट
प्रथम पारितोषिक स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ, वसई, द्वितीय पारितोषिक दिर्बा रामेश्वर भजन मंडळ, कांदिवली,
तृतीय पारितोषिक हनुमान प्रासादिक भजन मंडळ, भांडूप, वैयक्तिक पारितोषिक
उत्कृष्ट गायक पुरुष तेजस महाराव, उत्कृष्ट गायिका महिला सीता घाडीगावकर,
पखवाज वादक पुरुष क्षितिज राणे, पखवाज वादक पुरुष विशेष हर्ष परब, तबला वादक महिला रितिका वडपल्ली, चकवा वादक पुरुष राहुल तामाणेकर, चकवा वादक महिला अनन्या सावंत, या भजन स्पर्धेचे परीक्षण गणेश गाडगीळ बुवा, श्रीमती छाया गद्रे व शैलेश सावंत यांनी केले. या स्पर्धेत एकूण 20 पुरुष व 12 महिला भजन मंडळे सहभागी झाली होती. पुरस्कारांचे मानकरी
कोकण युवा प्रतिष्ठानमार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकण भूषण पुरस्कार पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना प्रदान करण्यात आला. तर कोकण कलारत्न पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांना गौरविण्यात आले व चंद्रकांत तिरलोटकर बुवा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. अन्य पुरस्कार याप्रमाणे
कोकण समाजरत्न सुभाष लाड
कोकण साहित्यरत्न उमेश जाधव
कोकण कृषीरत्न मिथिलेश देसाई,
कोकण क्रीडारत्न रमेश म्हामुणकर
कोकण उद्योगरत्न मंगेश पंडित
कोकण शिक्षणरत्न विजय हटकर,
कोकण शौर्यरत्न मुग्धा राणे,
कोकणरत्न पत्रकारिता प्रशांत माने यासोबत वन्यजीव छायाचित्रकार सीताराम राऊळ, कंटेंट क्रिएटर गौरी पवार, सारेगमप गायिका कु. ज्ञानेश्वरी गणेश गाडगे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. या बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळ्याला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक संजय पावशे, जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अभिजीत सावंत, योगेंद्र भोईर, ओम लोके, निवृत्त सचिव कंडोंमपा चंद्रकांत माने, माजी गटशिक्षण अधिकारी विजय बाराथे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद कोटकर, लेखक सुरेश हांडे, डॉ. मानसी ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय चाळके, अध्यक्ष दिनेश मोरे, उपाध्यक्ष सच्चिदानंद हांदे, सचिव विराज चव्हाण, खजिनदार रोहन मोरे, भजन स्पर्धा प्रमुख रोशन मोरे तसेच कुणाल मोरे, शुभम केगडे, रोशन प्रसादे, दीपेश बारस्कर, वेदांत चव्हाण, कैवल्य राणे, ममता घाग, मुक्ता जाधव आणि कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी केले व विराज चव्हाण यांनी आभार मानले.

