एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्यांचे वाटप
शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘अल्बेंडाझोल’ (Albendazole) ही जंतनाशक गोळी देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांना या गोळीचे महत्त्व व आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षक वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मनीष पाडवी, तसेच ज्येष्ठ शिक्षिका उर्मिला मोरे, ललिता पानपाटील आणि शारदा पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जंतनाशक गोळी देण्यामागचा उद्देश व त्याचे फायदे,
राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमांतर्गत दिली जाणारी ‘अल्बेंडाझोल’ गोळी मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे पोटातील जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत होते. या गोळीचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत, पोटातील जंत नाश ही गोळी पोटातील जंत नष्ट करण्यास मदत करते. आरोग्य सुधारणा, यामुळे मुलांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. रक्तक्षय नियंत्रण, मुलांमधील रक्तक्षयाचा (अॅनिमियाचा) धोका कमी करण्यास मदत होते. पोषण आणि वाढ, मुलांची भूक, योग्य पोषण आणि शारीरिक वाढ सुधारण्यास मोठी मदत होते, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर आणि अध्ययन क्षमतेवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

