आगामी सण-उत्सवांच्या काळात अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम,पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
ही बाब लक्षात घेता, शहर वाहतूक शाखेमार्फत सण-उत्सवांच्या कालावधीत अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. उल्लंघन आढळल्यास संबंधित पालक व वाहन मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदेशीर तरतुदी (मोटार वाहन अधिनियम, 1988 सुधारणा 2019) कलम 5 सह 180: अल्पवयीनास वाहन देणाऱ्या मालकास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 4 सह 181: अल्पवयीन वाहनचालकास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 199A: पालक/वाहन मालकास 3 वर्षांपर्यंत कारावास व 25,000 रुपये दंड, वाहनाची नोंदणी 12 महिन्यांसाठी
रद्द आणि मुलास 25 वर्षे वयापर्यंत लायसन्स नाही. हा गुन्हा तडजोडपात्र नसून प्रकरण न्यायालयात जाते.
शहर वाहतूक शाखेचे नागरिकांना आवाहन, अल्पवयीन मुला-मुलींना कोणत्याही परिस्थितीत, कितीही कमी अंतरासाठी असले तरी, वाहन चालविण्यास देऊ नये. वाहनाच्या चाव्या मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवाव्यात. आपले वाहन मित्र, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या अल्पवयीन मुलांनाही देऊ नये; वाहन मालक म्हणून आपण जबाबदार ठरू शकता. शाळा व महाविद्यालयांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन घेऊन येण्यास प्रतिबंध करावा.
सण-उत्सव आनंदात व सुरक्षितपणे साजरे करण्यासाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहर वाहतूक शाखा, नंदुरबार यांना सहकार्य करावे, असे आवाहन जगदिश दिलीप गावीत, प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार यांनी केले आहे.

