जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत विकासकामांच्या खर्चाचा आढावा

(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत विकासकामांच्या खर्चाचा आढावा
district-planning-committee-expenditure-review
        या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आदिवासी उपयोजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना (SCP) अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामे व निधी खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे, प्रशासकीय मान्यता आणि विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी आवश्यक तांत्रिक मान्यतेसह प्रस्ताव वेळेत सादर करून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
       बांधकाम कामांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यावरही भर देण्यात आला. कोणतेही विकासकाम आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रलंबित राहून पुढील कालावधीत स्पिलओव्हर होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले.
विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा वेळेत विनियोग आणि कामांचा दर्जा कायम राखण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: