इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे

पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच […]
इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे
The State Government is positive regarding the measures necessary for a long-term and sustainable water supply for Ichalkaranji city and its surrounding areas.

पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर; तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: