राजधानीत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहाय्यक लेखा अधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र […]
राजधानीत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Tributes paid to Indira Gandhi on her birth anniversary in the capital

नवी दिल्ली: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहाय्यक लेखा अधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.

000000000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 254

एक्स वर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi / https://x.com/MahaMicHindi

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: