
ग्रामस्थांना मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून नैना क्षेत्रातील नगर रचना योजना प्रलंबित आहेत. मंजूर योजनांमध्ये त्रुटी असल्याचे नागरिक व लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्वेक्षण करून त्रुटी दूर कराव्यात. तसेच जमीन मोजणीसाठी शासनाने खासगी यंत्रणांना मंजुरी दिली आहे. नैना क्षेत्रातील तसेच विविध महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, रस्ते, विकास आराखडा आणि पायाभूत सुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरात लवकर नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात यावी. गावकऱ्यांना पात्रतेनुसार जमिनीचे वाटप करावे. नैना क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर शहरे आणि प्रकल्प उभे राहणार असतील, तर त्यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. कोंढाणे, केटवणे, बाळगंगा आदी जलस्रोतांचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याची गरज आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे















