Home महाराष्ट्र महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अर्जाची मुदतवाढ

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अर्जाची मुदतवाढ

1
Extension of application deadline for Maharashtra Group-B (Non-Gazetted) Preliminary Examination

 मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन १४ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात (क्र. ०११/२०२६) प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत आता १४ मे २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १४ मे २०२६ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत काढण्याची अंतिम तारीख १६ मे २०२६ असून, चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १८ मे २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीतील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संबंधित शुद्धिपत्रक आणि मूळ जाहिरात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची माहिती उपसचिव सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.

error: Content is protected !!