भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिलेला इशारा आणि राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली. नांदेड व रायगड जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, तातडीने मदत व बचाव […]
भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिलेला इशारा आणि राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.
In the wake of the India Meteorological Department's warning of heavy rainfall and the ongoing heavy rains across the state, Disaster Management Minister Girish Mahajan attended the State Emergency Control Room in the ministry and reviewed the situation.

मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली. नांदेड व रायगड जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, तातडीने मदत व बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करावे, अशा सूचना मंत्री श्री. महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना योग्य वेळी सतर्कतेचे संदेश पाठवावेत, नद्यांच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ते निर्णय घ्यावेत, तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवावी, असे निर्देशही देण्यात आले.

#पाऊस

#मान्सून

#MumbaiRains

#MaharashtraRains

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: