
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी वसुधैवकुटुंबकम् चा संदेश, भारताची संस्कृती आणि मूल्ये आपल्या देशात पोहोचवावीत, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.
महान संस्था या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांमुळे उभ्या राहतात. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानावर आधारित संस्था उभारून जगभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. ही संस्था केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनाची आणि व्यक्तिमत्त्वाचीही जडणघडण करते.
यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष, अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ.एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई येथील फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके आदी उपस्थित होते.















