एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी महेश बुरंगे, सचिवपदी देवेंद्र कासार
जळगाव/धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश बुरंगे यांची तर सचिवपदी देवेंद्र कासार यांची निवड झाली.
नुकत्याच झालेल्या सदस्यांच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – गणेश लिधुरे, नरेश प्रसाद, कार्याध्यक्ष – अक्षय पाडसवान, सहसचिव – चंद्रकांत सोनवणे, श्रीकांत शास्त्री, सचिन कोळी, राकेश पावरा, कोषाध्यक्ष – राजेंद्र मनोरे, महिला प्रतिनिधी – तन्वी मोरे, श्वेता गांगुर्डे, विधी सल्लागार – सुनील गबाळे, सल्लागार – मनोज भराडे, प्रसिद्धीप्रमुख – ज्ञानेश्वर आर्दड. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस डॉ.शिवाजी तिकांडे, संघटन सचिव प्रवीण गायकवाड यांच्यासह संघटनेच्या सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
