
जिल्हा नंदुरबारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी e-KYC प्रक्रिया आजपासून जिल्हाभरातील आपले सरकार सेवा केंद्रांवर (ASSK) सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही सुरू आहे :
संबंधित सर्व बँकांनी सुरुवातीच्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या असून त्या ग्रामपंचायत स्तरावर प्रकाशित करण्यात येत आहेत.
MahaIT मार्फत संबंधित पात्र लाभार्थ्यांना महा ऑनलाईन पोर्टलवर e-KYC प्रक्रियेसाठी मॅप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर (ASSK) शहरी व ग्रामीण भागातील पात्र शेतकऱ्यांची e-KYC प्रक्रिया वेगाने सुरू असून लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ थेट प्रदान करण्यात येणार आहे.
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर#शेतकरीकर्जमुक्तीयोजना#eKYC#आपलेसरकारसेवाकेंद्र#ASSK#MahaIT#शेतकरीकल्याण#नंदुरबार#महाराष्ट्रशासन#लोकाभिमुखप्रशासन















