हाफकिन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; महामंडळ अद्ययावत करण्याचे निर्देश

हाफकिनच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात नुकतीच एक बैठक पार पडली. हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना 'सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना' लागू करणे आणि महामंडळाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
हाफकिन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; महामंडळ अद्ययावत करण्याचे निर्देश
Positive discussions held regarding pending issues of Haffkine employees; directives issued to modernize the corporation.

हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला लागणाऱ्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्येच करण्यात यावी, असा प्रस्ताव तात्काळ पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश उपसभापती अहिर यांनी प्रशासनाला दिले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: