आयडियल सेंटर डिजिटल लॅब’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून

कठीण मानले जाणारे विषयही अत्यंत सोपे, रंजक आणि मनोरंजक होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॅबच्या उद्घाटनानंतर व्यक्त केला.सर्व वर्गांचा संपूर्ण अभ्यासक्रम या डिजिटल प्रणालीमध्ये आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करणे अधिक सोपे, परिणामकारक आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. या प्रणालीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची विशेष सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये […]
आयडियल सेंटर डिजिटल लॅब’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून
Through the 'Ideal Center Digital Lab,' students will now receive modern education using audio-visual methods, and...

कठीण मानले जाणारे विषयही अत्यंत सोपे, रंजक आणि मनोरंजक होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॅबच्या उद्घाटनानंतर व्यक्त केला.सर्व वर्गांचा संपूर्ण अभ्यासक्रम या डिजिटल प्रणालीमध्ये आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करणे अधिक सोपे, परिणामकारक आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. या प्रणालीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची विशेष सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच तांत्रिक आणि डिजिटल कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक डिजिटल लॅब उभारण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

#शाळाप्रवेशोत्सव

#प्रवेशोत्सव२०२६

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: