UPSC-CSE मार्गदर्शनातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची नवी दिशा!
💡 डॉ. मित्ताली सेठी यांनी UPSC-CSE ही केवळ परीक्षा नसून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. समस्या सोडविताना तथ्य, उपलब्ध माहिती, नागरिकांच्या गरजा, प्रशासकीय मर्यादा आणि दीर्घकालीन परिणामांचा समतोल विचार करण्याचे महत्त्व त्यांनी अनुभवाधारित उदाहरणांतून स्पष्ट केले.
🩺 वैद्यकीय विद्यार्थ्यांची वैज्ञानिक विचारसरणी, संवादकौशल्य आणि समाजाशी असलेला प्रत्यक्ष संपर्क ही प्रशासकीय सेवेसाठी उपयुक्त कौशल्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.
📚डॉ. पंकज पटले यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी, चालू घडामोडी, उत्तरलेखन, वेळेचे नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले.
🙋♀️ विद्यार्थ्यांनी UPSC तयारी, मुलाखत, वैद्यकीय क्षेत्रातून नागरी सेवेत प्रवेश आणि प्रशासनातील डॉक्टरांची भूमिका याबाबत प्रश्न विचारले. मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली.
🌟वैद्यकीय ज्ञान + प्रशासकीय कौशल्य = व्यापक समाजसेवेची नवी संधी!

