उमरखेड वनपरिक्षेत्रातील विकासकामांना गती द्या; पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य – वनमंत्री गणेश नाईक

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड (जि. यवतमाळ) वनपरिक्षेत्रातील वन विभागाची कार्यालये व निवासस्थानांची सद्यस्थिती, प्रस्तावित बांधकामे आणि कॅम्पा वार्षिक नियोजन आराखडा २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. उमरखेड येथील बांधकामांसाठी अंदाजे ४ कोटी ५९ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून या प्रस्तावास तातडीने पुढे पाठवून […]
उमरखेड वनपरिक्षेत्रातील विकासकामांना गती द्या; पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य – वनमंत्री गणेश नाईक
Accelerate development works in the Umarkhed forest range; prioritize environmental conservation – Forest Minister Ganesh Naik.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड (जि. यवतमाळ) वनपरिक्षेत्रातील वन विभागाची कार्यालये व निवासस्थानांची सद्यस्थिती, प्रस्तावित बांधकामे आणि कॅम्पा वार्षिक नियोजन आराखडा २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उमरखेड येथील बांधकामांसाठी अंदाजे ४ कोटी ५९ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून या प्रस्तावास तातडीने पुढे पाठवून आवश्यक कार्यवाही करावी. वन्यजीव आणि मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२ गावांची सविस्तर माहिती तातडीने सादर करावी, त्यानंतर किती गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करता येतील याचा आढावा घेण्यात येईल. वन विभागाच्या विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि झाडांची जोपासना यांना प्राधान्य देण्यात यावे – वनमंत्री नाईक

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: