शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही – महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ॲड. प्रफुल्ल चव्हाण, नितीन भुतडा, प्रिया तोडसाम, आरती फुफाटे, देवानंद पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
पीक पेराचा विषय ऑन द स्पॉट मार्गी
या पाहणी दौऱ्यादरम्यान डीसीएस ॲपवर पीक पेरा नोंदणी केल्यानंतर सॉफ्टवेअर/संकेतस्थळावर हा पीक पेरा प्रदर्शित होत नसल्याची बाब महसूल मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्याची वेळीच दखल घेत अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांना कॉन्फरन्स कॉल करून अडचणी सोडविण्याचे निर्देश महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

