शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षणातून शाळांमध्ये क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा प्रयत्न

(नंदुरबार) जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. १७ ते २१ ऑगस्टदरम्यान आयोजित शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. या प्रशिक्षणाचा उद्देश शिक्षकांमध्ये क्रीडा विषयक कौशल्ये विकसित करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच शाळांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे हा आहे. प्रशिक्षणादरम्यान क्रीडा शिक्षकांना नियोजित कार्यक्रमानुसार विविध क्रीडा प्रकारांचे […]
शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षणातून शाळांमध्ये क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा प्रयत्न
An effort to strengthen sports culture in schools through sports training for teachers.

(नंदुरबार) जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. १७ ते २१ ऑगस्टदरम्यान आयोजित शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. 🏃‍♀️🏆

या प्रशिक्षणाचा उद्देश शिक्षकांमध्ये क्रीडा विषयक कौशल्ये विकसित करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच शाळांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे हा आहे. प्रशिक्षणादरम्यान क्रीडा शिक्षकांना नियोजित कार्यक्रमानुसार विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. ⚽🏐🏸

यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पंकज पटले, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा निर्मल माळी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदुरबार प्रकल्प साबळे सर, तळोदा व नंदुरबार प्रकल्पातील प्रत्येकी २५ शिक्षक, मांदेशी फाउंडेशनची टीम तसेच प्रशिक्षक उपस्थित होते. 👥

संबंधित आश्रमशाळांमध्ये VB-G-RAM-G योजनेतून प्रमाणित क्रीडांगणे विकसित करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मागणीनुसार आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 🏟️🎯

शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य, शिस्त आणि संघभावना रुजविण्यास या उपक्रमामुळे निश्चितच चालना मिळणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: