Home धडगाव लोकसहभागातून चारा व वृक्षलागवडीचा अभिनव प्रयोग; सातपुड्यात शाश्वत विकासाला नवी दिशा

लोकसहभागातून चारा व वृक्षलागवडीचा अभिनव प्रयोग; सातपुड्यात शाश्वत विकासाला नवी दिशा

1
An innovative initiative for fodder and tree plantation through public participation; a new direction for sustainable development in the Satpuda region.

(नंदुरबार) धडगाव तालुक्यातील दुर्गम कुवरखेत येथे सामूहिक वन हक्क (CFR) क्षेत्रातसामुदायिक चारा व वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय कुरण व पशुपालक वर्ष–२०२६ निमित्त आयोजित करण्यात आला. 🐄🌳

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार आणि भारतीय गवताळ प्रदेश व चारा संशोधन संस्था (IGFRI), धारवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कुवरखेत व कात्री येथील CFR क्षेत्रात शेतकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून चारा लागवड करण्यात येत आहे. महाराष्ट्रात लोकसहभागातून सामुदायिक चारा लागवडीचा हा अभिनव प्रयोग ठरत आहे. 🌾

💧 सातपुड्यात पावसामुळे होणारी मातीची धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन करणे, नैसर्गिक गवताळ क्षेत्राचे संरक्षण करणे आणि पशुधनासाठी वर्षभर चारा उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत.

💬 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी CFR क्षेत्राचे सामुदायिक सहभागातून शाश्वत व्यवस्थापन करण्यावर भर दिला. “चारा उपलब्धता – पशुधन उत्पादकता – पशुपालकांचे उत्पन्न” ही साखळी मजबूत करण्यासाठी ग्रामसभा, वनहक्क समिती, पशुपालक आणि विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बांबू व बहुउपयोगी वृक्षलागवड, Fodder Mart आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार व उत्पन्नवाढीस मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. 🤝

IGFRI, धारवाडच्या शास्त्रज्ञांनी योग्य गवत प्रजाती, लागवड तंत्रज्ञान, बियाणे व्यवस्थापन, चारा उत्पादन, कापणी व साठवणुकीबाबत मार्गदर्शन केले. 👩‍🌾

कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी सामूहिक वनपट्ट्यात चारा व वृक्षलागवड केली. महिलांचा मोठा सहभाग हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. 🌳💚