धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून उदयी नदीवर माती बंधाऱ्याची निर्मिती

अक्राणी तालुक्यात यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, धनाजे बुद्रुक ग्रामपंचायत, जलसाक्षरता समिती अक्राणी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून उदयी नदीवर माती बंधारा उभारण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून उदयी नदीवर माती बंधाऱ्याची निर्मिती
villagers-build-earthen-dam-udai-river-shramdaan-dhanaje-budruk-dhadgaon
  • उद्देश आणि उपक्रम: पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी तसेच बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जेसीबीच्या साहाय्याने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून हा बंधारा तयार करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसाक्षरता ही काळाची गरज असल्याचे मत जलसाक्षरता समितीचे भरत पावरा यांनी व्यक्त केले.
  • उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ: याप्रसंगी सरपंच सुनीता परमार, ग्रामसेवक दाशा पावरा, अनिल पावरा, बळीराम पावरा, चंद्रसिंग पावरा, रमेश पावरा, गणेश भाऊ, बायला पावरा, आदिती पावरा, जितेंद्र पावरा, बादल पावरा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, जलसाक्षरता समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: