ईद-ए-मिलादनिमित्त रक्तदान शिबिर; ४५ दात्यांनी केले रक्तदान
नंदुरबार शहरात ईद-ए-मिलाद निमित्त दोशाख तकीया ब्लड फाउंडेशन व दोशाख तकीया यंग सर्कलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात ४५ दात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला असून, आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

