कोठलीत वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा संदेश
कोठली येथील के.डी.गावित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी युवामित्र संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनिल चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, कोठली केंद्राचे केंद्रप्रमुख शिंपी, प्राचार्य एस.टी.माळी, मुख्याध्यापक मगन राठोड, वृक्षमित्र रामराव पाटील, पंकज पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रवेळी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व या विषयी माहिती देण्यात आली. तसेच वृक्षारोपणासह संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास युवामित्र संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

