नॅशनल गर्ल्स हायस्कूलमध्ये उर्दू वाचन अभियान
अभियानाच्या कालावधीत पुस्तक प्रदर्शन, कथाकथन सत्र व दर आठवड्याला ३० मिनिटांच्या विशेष वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी कथा, कविता, चरित्रात्मक पुस्तके, प्रेरणादायी व संस्कारक्षम साहित्याचे आवडीने वाचन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये नियमित वाचनाची सवय दृढ होण्याबरोबरच त्यांच्या शब्दसंपत्तीतही लक्षणीय वाढ झाली.

