खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मध केंद्र योजने’साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
• मध उद्योगाचे संपूर्ण मोफत प्रशिक्षण.
• आवश्यक साहित्यासाठी 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक.
• उत्पादित मधाची शासनाच्या हमीभावाने खरेदी.
• विशेष / छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशा संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती.
पात्रता व निकष:
वैयक्तिक मधपाळ गट:
• अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
• स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
• मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ / व्यक्ती):
• अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण व वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे.
• स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन (मालकीची किंवा भाडेतत्त्वावर) असणे आवश्यक.
• मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक संस्था:
• संस्था नोंदणीकृत असावी.
• संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1 एकर शेती जमीन असावी.
• प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी किमान 1 हजार चौ. फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत व आवश्यक प्रशिक्षित सेवक असणे आवश्यक.
प्रमुख अटी व शर्ती:
• निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास हमीपत्र (बंधनपत्र) लिहून देणे बंधनकारक राहील.
• मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

