विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ […]
विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल
Changes in the Special Abbreviated Voter List Revision Program

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.

मतदारयादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: