Home नंदुरबार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर उत्साहात संपन्न; विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला

छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर उत्साहात संपन्न; विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला

1
Chhatrapati Shivaji Maharaj Self-Respect Camp concludes enthusiastically; citizens benefit from various schemes.

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला बळ देणारे **”छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर”** संत श्री गजानन महाराज मंदिर सांस्कृतिक सभागृह, नंदुरबार येथे उत्साहात संपन्न झाले.

🔹 कार्यक्रमाचे उद्घाटन **डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार**, श्रीमती. रत्नाताई रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद, श्री. विजय चौधरी, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, अपर जिल्हाधिकारी श्री धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उपविभागीय अधिकारी श्री बंडू कापसे यांनी मार्गदर्शन केले.

🔹 विविध विभागांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच अनेक लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आले.

✅ **प्रमुख लाभ वितरण :**

📌 प्रधानमंत्री आवास योजना – **१८** लाभार्थी

📌 कुंभार समाज ओळख प्रमाणपत्र – **५२** लाभार्थी

📌 अंत्योदय रेशनकार्ड – **१५६** लाभार्थी

📌 सिकलसेल अपंग कार्ड – **१०** लाभार्थी

📌 आयुष्मान भारत कार्ड – **१२** लाभार्थी

📌 स्वामित्व योजनेअंतर्गत सदनिका – **१२** लाभार्थी

📌 संजय गांधी व इंदिरा गांधी योजनांतर्गत **२७६** लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण.

🔹 **जिवंत सातबारा मोहिमेत** विविध प्रकारच्या नोंदी कमी करून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला. तसेच महिला वारस नोंदी, स्वतंत्र ७/१२ तयार करणे आणि इतर महसुली प्रकरणांमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली.

🤝 नागरिकांना शासनाच्या योजनांचा पारदर्शक व वेळेवर लाभ मिळावा, प्रशासन अधिक संवेदनशील व नागरिकाभिमुख व्हावे, असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.

.

.

.

#नंदुरबार#छत्रपतीशिवाजीमहाराजस्वाभिमानशिबिर#डॉमित्तालीसेठी#महाराष्ट्रशासन#लोकाभिमुखप्रशासन#शासनआपल्यादारी#जनकल्याण#महसूलविभाग#आयुष्मानभारत#प्रधानमंत्रीआवासयोजना#स्वामित्वयोजना#सिकलसेलअभियान#नंदुरबारजिल्हा